2010/03/25

कविता आस

आस

उभा जन्म गेला
देण्यात माया
शिणली काया
कष्टाने
मनी आहे एकच
भाकरीची आस
पोटी उपवास
नित्याचाच
आट्वाव आम्ही
कष्टानं गा रक्त
ओंजळभर फक्त
वाट्याला
घरचेच आम्ही
आहोत फक्त राव
उभे आहे साव
दारात।


प्रीती तड़स

No comments:

Post a Comment