2010/03/28

विज्ञानावर आधारित संकलित सुविचार

विज्ञानावर आधारित संकलित सुविचार


१- शास्त्रज्ञ मनात अणतीलतर ते आपल्या संशोधनाचा उपयोग सुन्दर जग निर्माण करण्यासाठी करू शकतील

२-जड़त्वाच्या विलक्षण वेग प्राप्त झाल्यास जड़त्वाच्या एका कनातुन सामर्थ्याचे डोंगर उभे राहू शकतात।
३- मला सर्व कळते असे समजू नका आणि दुसर्याने केलेल्या स्तुतित कधीही भाळू नका ।

प्रीती तड़स

2010/03/25

कविता आस

आस

उभा जन्म गेला
देण्यात माया
शिणली काया
कष्टाने
मनी आहे एकच
भाकरीची आस
पोटी उपवास
नित्याचाच
आट्वाव आम्ही
कष्टानं गा रक्त
ओंजळभर फक्त
वाट्याला
घरचेच आम्ही
आहोत फक्त राव
उभे आहे साव
दारात।


प्रीती तड़स

2010/03/23

संकलित सुविचार

संकलित सुविचार
1)दारिद्र्य हसण्याला फार भीते।
2)पवित्र्याला वय नसते।
3)चित्र ही हाताची कृती आहे, परन्तु चरित्र ही मनाची कृती आहे ।
4) समाजाची शोभा ज्ञानी मानसे तर ज्ञानी माणसाचे भूषण क्षमा व् त्याग .
प्रीती

2010/03/19

संकलित सुविचार


संकलित सुविचार


१) जीवनाची योग्य रितीने मांडणी करण्याची कला हीच सफल जीवनाची गुरुकिल्ली

2) जीवनात काही साध्य करायचे असेल तर दोन गोष्टीची आवश्यकता आहे -एक ध्यास आणि दूसरी अभ्यास।

३) दुसर्याच्या सुख दुःखात सहभागी होणे हेच खरे शिक्षण होय ।

४) पैशाच्या हव्यासापेक्षा ज्ञानाचा हव्यास हवा ।

५) आपले दोष दिसू लागल्यापासून उत्कर्षाचा प्रारंभ होतो .

2010/03/17

वात्सल्य

वात्सल्य
वासराच्या हुबरण्याने
जिव तळमळे गाईचा
बालकाच्या दुःखाने
जिव कंठाशी येतो आईचा.
preeti

charoli

माणसा माणसातील नात्याचा
ओलावा कधीचाच विरून गेला
मतभेदाने प्रेमाचा सागर
कधीचाच जिरून गेला।
preeti

2010/03/14

संकलित साहित्य

स्वैर फीरणार पाखराला
परतन्याची तमा नसावी
अंधारून जरी आले
उजेडाची आशा असावी
पकड़ता यईल छिया माजी
अशी जीवनाची नशा असावी -