2010/02/19

चारोळी

लोकांच्या वागण्यात
काय हा विरोधाभास
जगणारा राहतो उपाशी
मेलेल्यांना पिडांचा घास।
प्रीती ......


असाही आहे आम्हाला
आमच्या संकृतीचा नाद
एकीकडे उभारतात पुतळे
दुसरीकडे पुतळयावरून वाद।
प्रीती........


चारोळी

जीवनाचा अंत
हिच जीवनाची रित आहे
प्रत्येकाच्या तोंडी राम-नाम
हे गीत आहे।

प्रीती

मराठी कविता

रक्षक आणि भक्षक
एकाच मनाच्या दोन प्रवृती
रक्षण करणारा योद्धा वीर
तर,
भक्षण करणारा पशाविर
पण,
रक्षक भक्षक बनला तर ?
दानिच कृतघ्न बनला तर ?
समाज अधांतरी ----------
जनता अधांन्तरी -----------
अन्
नैतिकता .........................?


preeti tadas

मराठी कविता

एक सवाल

तुझी ती,
कधीही न परतणारी
पाठमोरी साऊली
एकदा तरी वळवायची होतीस
अन
स्वतःच्या हृदयाला विचारायचा होता
एक सवाल -
'माझ्या ङोळयातील समुद्र खरचं फसवा होता का?.'

प्रीती तड़स