2010/03/23

संकलित सुविचार

संकलित सुविचार
1)दारिद्र्य हसण्याला फार भीते।
2)पवित्र्याला वय नसते।
3)चित्र ही हाताची कृती आहे, परन्तु चरित्र ही मनाची कृती आहे ।
4) समाजाची शोभा ज्ञानी मानसे तर ज्ञानी माणसाचे भूषण क्षमा व् त्याग .
प्रीती

2010/03/19

संकलित सुविचार


संकलित सुविचार


१) जीवनाची योग्य रितीने मांडणी करण्याची कला हीच सफल जीवनाची गुरुकिल्ली

2) जीवनात काही साध्य करायचे असेल तर दोन गोष्टीची आवश्यकता आहे -एक ध्यास आणि दूसरी अभ्यास।

३) दुसर्याच्या सुख दुःखात सहभागी होणे हेच खरे शिक्षण होय ।

४) पैशाच्या हव्यासापेक्षा ज्ञानाचा हव्यास हवा ।

५) आपले दोष दिसू लागल्यापासून उत्कर्षाचा प्रारंभ होतो .

2010/03/17

वात्सल्य

वात्सल्य
वासराच्या हुबरण्याने
जिव तळमळे गाईचा
बालकाच्या दुःखाने
जिव कंठाशी येतो आईचा.
preeti

charoli

माणसा माणसातील नात्याचा
ओलावा कधीचाच विरून गेला
मतभेदाने प्रेमाचा सागर
कधीचाच जिरून गेला।
preeti