2010/03/19

संकलित सुविचार


संकलित सुविचार


१) जीवनाची योग्य रितीने मांडणी करण्याची कला हीच सफल जीवनाची गुरुकिल्ली

2) जीवनात काही साध्य करायचे असेल तर दोन गोष्टीची आवश्यकता आहे -एक ध्यास आणि दूसरी अभ्यास।

३) दुसर्याच्या सुख दुःखात सहभागी होणे हेच खरे शिक्षण होय ।

४) पैशाच्या हव्यासापेक्षा ज्ञानाचा हव्यास हवा ।

५) आपले दोष दिसू लागल्यापासून उत्कर्षाचा प्रारंभ होतो .

2010/03/17

वात्सल्य

वात्सल्य
वासराच्या हुबरण्याने
जिव तळमळे गाईचा
बालकाच्या दुःखाने
जिव कंठाशी येतो आईचा.
preeti

charoli

माणसा माणसातील नात्याचा
ओलावा कधीचाच विरून गेला
मतभेदाने प्रेमाचा सागर
कधीचाच जिरून गेला।
preeti

2010/03/14

संकलित साहित्य

स्वैर फीरणार पाखराला
परतन्याची तमा नसावी
अंधारून जरी आले
उजेडाची आशा असावी
पकड़ता यईल छिया माजी
अशी जीवनाची नशा असावी -

2010/02/19

चारोळी

लोकांच्या वागण्यात
काय हा विरोधाभास
जगणारा राहतो उपाशी
मेलेल्यांना पिडांचा घास।
प्रीती ......


असाही आहे आम्हाला
आमच्या संकृतीचा नाद
एकीकडे उभारतात पुतळे
दुसरीकडे पुतळयावरून वाद।
प्रीती........